घौदव Ghaudav (Marathi Story) निकेतन तोषण Niketan Toshan
घौदव (Marathi Story) निकेतन तोषण (पार्ट 1) ============================= 03/07/2017 जुलैच्या पावसाळ्याचे दिवस चालू होते।रात्रीं चा भयाण अंधारात रात किडे ओरडत होती, तो बेडकांचा आवाज, पाण्याचा तो कल कल आवाज। मना मधल्या जुन्या आठवणी आठवण करून देत होत्या। एका अंधार खोली मध्ये छोटा मातीचा तेलाचा दिवा टीम टीम जळत होता। मी त्या अंधारा मध्ये बसून विचार करत होतो की गोष्ट माझी सुरू कुठण करु। मित्रांनी केलेला घात आणि विस्कटलेल्या जीवनाचे पान लिहू तरी कुठना। मी तसा वैद्य होतो , अजय, ५.८ उंची, हलका गोरा, साधारण शरीर वाला। माझे वडील यवतमाळ जिल्यातील एक नामवंत वैद्य होते। त्यांचा मार्गदर्शन खाली मी पण सगळे गुण आत्मसात केले। वयाचा 50 वर्षी त्यांचे निधन झाले आणि सोबत आई पण गेली। मी 23 वर्षाचा आणि हाती वडिलांची वैद्यकीय किर्या डायरी। ज्या मध्ये एकुण एक असा व्याध्या आणि विकारची माहिती होती। जीवना मध्ये एक दम एकटाच होतो। घरात ऐकट राहून सगळया जुन्या आठवणी समोर येत होत्या। मग एक विचार केला की आता या घरातून निघून दुसऱ्या शहरात आपलं जीवन सुरू करावे। तिचं मी माझं हॉस्पिल टाकून तिकडे सेवा करील। मी अमरावती ला ...